Thursday, August 22, 2019

ज्योतिष शास्त्री परीक्षा २०१९ - २० निबंधाचे मूल्यमापन आणि गुण वर्गीकरण

ज्योतिष शास्त्री परीक्षा २०१९ - २० कुंडली संग्रह मूल्यमापन फॉर्म

ज्योतिष शास्त्री परीक्षा २०१९ - २० प्रवेश अर्ज

ज्योतिष शास्त्री परीक्षा २०१९ - २० कुंडली संग्रह नमुना पत्रिका

ज्योतिष शास्त्री परीक्षा २०१९ - २० अभ्यासक्रम

ज्योतिष शास्त्री परीक्षा २०१९ - २० माहितीपत्रक

Monday, August 19, 2019

महाराष्ट्र ज्योतिष परिषद - स्वाध्याय - ज्योतिष शास्त्री परीक्षा २०२०


महाराष्ट्र ज्योतिष परिषद
संस्था रजि क्र. BOM-709/GBBSD   सार्वजनिक विश्वस्त क्र. F-7294 मुंबई
१४/१५,एकता को ऑ हौसिंग सोसायटी, नवरे कंपाऊंड, पंडित दीनदयाळ मार्ग, डोंबिवली (पश्चिम),पिन-४२१ २०२.
संकेत स्थळ: maharashtrajyotishparishad.blogspot.com       
ई-मेल: mahajyotishparishad@gmail.com


ज्योतिष शास्त्री परीक्षा २०२०


ज्योतिष फलादेश स्वाध्याय  ( गुण  - २५)


ज्या जातकांना सोरायसिस (Soriasis) या त्वचारोगाचा त्रास होतो आहे अशा ३ जातकांच्या पत्रिका घेऊन त्यांना हा त्रास होण्याची ज्योतिषीय कारणे विषद करणे व इतर त्वचारोग व हा रोग होण्यासाठी विशेषत्वाने लागणारे ज्योतिषीय नियम यांचा उहापोह होणे आवश्यक आहे.


गणित स्वाध्याय  ( गुण  - २५)

प्र. १. एका बालकाचा जन्म ला पाझ (बोलिव्हिया) La paZ (Bolivia) अक्षांश १६.३१ दक्षिण व रेखांश ६८.०९ पश्चिम येथे दिनांक १ एप्रिल २०१९ रोजी तेथील विभागीय वेळेनुसार सकाळी १० वाजून २५ मिनिटांनी झाला. बोलिव्हिया येथे ऑक्टोबर ते मार्च या काळात समर टाइम लागू होतो.           ( गुण  - ८)

        १) गणिताने रेखानंतर, घड्याळी फरक , रेखांतर संस्कार काढून इष्ट सांपातिक वेळ
            साधन करा.
       
        २) अयनांश २४.०७.१७ घेऊन लग्नादी द्वादश भाव स्पष्ट करा.


प्र. २.  सप्तशृंगी (नाशिक) अक्षांश २०.५८ (उत्तर) रेखांश ७३.५३ (पूर्व) येथे एका बालकाचा जन्म दि. ११/०८/२०१९ च्या पहाटे २ वाजून ३४ मिनिटांनी झाला आहे.  श्रीपती पद्धतीने या बालकाच्या पत्रिकेतील लग्नादी द्वादश भाव स्पष्ट करा.                                                                                                            ( गुण  - ८)

या गणितात पलभेवरून चरखंड, पळे  इ. साधन करून स्वोदय पळे काढणे व त्यावरून स्पष्ट लग्न सिद्ध करणे अपेक्षित करणे.

प्र. ३  अ)  नाशिक येथे दिनांक ४ एप्रिल २०१९ रोजी सूर्योदयागत ४० घटी २५ पळे या वेळी जन्मलेल्या                जातकाचे होरा लग्न, इंदुलग्न, आरूढलग्न स्पष्ट करा.                                              ( गुण  - ६)   


        ब) सोनालीचा जन्म २० डिसेंबर २०१८रोजी दुपारी २.३० मिनिटांनी (म्हणजे १४.३०) सोलापूर येथे झाला. तर तिच्या वयाच्या ४९व्या वर्षाची दिनवर्ष पद्धतीने कुंडली तयार करा.                           ( गुण - )
  

निबंध स्वाध्याय ( गुण  - २५)


विषय  १ : वकील  (Advocate)

यामध्ये वकीलीची बार कौन्सिलची सनद मिळवलेले व जे न्यायालयात गेली किमान ५ वर्ष वकीली करत आहेत अशा जातकांचे वकील होण्याची ज्योतिषीय नियम व कालनिर्णय यांचे विवेचन करुन निष्कर्ष काढणे अपेक्षित आहे. (वकीलाच्या त्याच्या वकीलीच्या विषयासंदर्भात विवेचन आवश्यक आहे.  उदा. क्रिमिनल, सिव्हील, कौटुंबिक इत्यादी)



विषय २  : मेदवृद्धी

मेदवृद्धीच्या १५ जातकांच्या पत्रिका निवडून त्यांची मेदवृद्धी होणे व अशी मेदवृद्धी होण्याची ज्योतिषीय  कारणे व कालनिर्णय खालील निकषांच्या आधारे विषद करणे अपेक्षित आहे.

१.   पाश्च्यात्य निकशांनुसार Body Mass Index – BMI.
२.  भारतीय आयुर्वेद शास्त्रानुसार उंचीच्या मानाने वजन जास्त असणे पर्यायाने पोट,   छाती, कुल्ले,दंड,मांड्या, मान या ठिकाणी मेदवृद्धि होऊन वजन वाढणे.


Friday, August 16, 2019

महाराष्ट्र ज्योतिष परिषद - कार्यकारिणी


महाराष्ट्र ज्योतिष परिषद

संस्था रजि क्र. BOM-709/GBBSD   सार्वजनिक विश्वस्त क्र. F-7294 मुंबई
१४/१५,एकता को ऑ हौसिंग सोसायटी, नवरे कंपाऊंड, पंडित दीनदयाळ मार्ग, 
डोंबिवली (पश्चिम),पिन-४२१ २०२.
संकेत स्थळ: maharashtrajyotishparishad.blogspot.com   ई-मेल:mahajyotishparishad@gmail.com



कार्यकारिणी

अध्यक्ष
 श्री अनिल देविदास चांदवडकर  (नाशिक)    - ९३७१८०४९३७

उपाध्यक्ष
श्री. सुनील केशव घैसास (डोंबिवली)  -  ९३२२२६६२५५
श्री. अरुण महादेव चव्हाण  (चेंबूर)    -  ९३२२८६३९६४

सरचिटणीस
श्री. संजीव लक्ष्मण जोशी (कल्याण)   -  ७७१५८४२३३० / ९४२३९८६२५४

खजिनदार
श्री. रवींद्र सोपान साठे ( कल्याण)  -  ९७०२२२२९५१

सदस्य
श्री. प्रमोद बगाराम उपाध्ये (पुणे)
श्री. प्रदीप भालचंद्र पाटणकर (डोंबिवली)
श्री. संदीप योगेन्द्र जोशी (ठाणे)
श्री. रवींद्र प्रभाकर बडवे (नाशिक)
सौ. सविता सुरेश वैद्य ( डोंबिवली)

परीक्षा  विभाग

सचिव
श्री. सुनील केशव घैसास (डोंबिवली)  -  ९३२२२६६२५५

सदस्य
श्री. अरुण महादेव चव्हाण  (चेंबूर)
श्री. प्रमोद बगाराम उपाध्ये (पुणे)
सौ. सविता सुरेश वैद्य ( डोंबिवली)


Tuesday, August 13, 2019

ज्योतिष शास्त्री परीक्षा २०१९ निकाल







निकालाबाबत सूचना



ज्योतिष शास्त्री २०१९ परीक्षेचा निकाल महाराष्ट्र ज्योतिष परिषदेच्या संकेत स्थळावर मिती  श्रावण शु. १३ शके १९४१ (दिनांक १३ ऑगस्ट २०१९) रोजी जाहीर करण्यात आम्हास आनंद होत आहे.


सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन. अयशस्वी विद्यार्थ्यांना पुन्हा प्रयत्न करण्यासाठी शुभेच्छा.


विद्यार्थ्यांचे गुण पत्रक संबंधित संस्थांकडे फेर तपासणीनंतर रवाना होईल. संकेत स्थळावरील गुण पत्रकाच्या आधारे विद्यार्थी फेर तपासणीसाठी अर्ज करू शकतील. फेर तपासणीचे अर्ज परिषदेकडे पोहोचण्याची अंतिम मुदत मिती  श्रावण कृ. १२ शके १९४१ (दिनांक २८ऑगस्ट २०१९) पर्यंत आहे. फेर तपासणी शुल्क प्रत्येक विषयासाठी          रु. २००. ०० आहे. निबंध हा स्वतंत्र विषय समजला जाईल. इतर तपशीलासाठी माहिती पत्रक पहावे.


फेर तपासणी साठी विद्यार्थ्यांनी संस्थेमार्फत अर्ज करावेत व संस्थांनी सर्व विद्यार्थ्यांची फेर तपासणी शुल्क दिलेल्या मुदतीत एकत्र पाठवावे.


विद्यार्थ्यांच्या नावात काही तफावत आढळल्यास त्वरित ई-मेल द्वारे कळवावे.


निकालासाठी खालील लिंक वापरा. Click Here


या वर्षाचा पदवीदान समारंभ लवकरच होईल व याबाबत  सर्व संबंधित विद्यार्थी व संस्था यांना कळवले जाईल. तसेच संकेत स्थळावर तसे सूचित केले जाईल.



अध्यक्ष

महाराष्ट्र ज्योतिष परिषद

विशेष सर्वसाधारण सभा सूचना - १९.०७.२०२५

https://drive.google.com/file/d/18_QyZtAgAlXg-FS31uWHn3FksUsHkhpd/view?usp=sharing