Monday, August 19, 2019

महाराष्ट्र ज्योतिष परिषद - स्वाध्याय - ज्योतिष शास्त्री परीक्षा २०२०


महाराष्ट्र ज्योतिष परिषद
संस्था रजि क्र. BOM-709/GBBSD   सार्वजनिक विश्वस्त क्र. F-7294 मुंबई
१४/१५,एकता को ऑ हौसिंग सोसायटी, नवरे कंपाऊंड, पंडित दीनदयाळ मार्ग, डोंबिवली (पश्चिम),पिन-४२१ २०२.
संकेत स्थळ: maharashtrajyotishparishad.blogspot.com       
ई-मेल: mahajyotishparishad@gmail.com


ज्योतिष शास्त्री परीक्षा २०२०


ज्योतिष फलादेश स्वाध्याय  ( गुण  - २५)


ज्या जातकांना सोरायसिस (Soriasis) या त्वचारोगाचा त्रास होतो आहे अशा ३ जातकांच्या पत्रिका घेऊन त्यांना हा त्रास होण्याची ज्योतिषीय कारणे विषद करणे व इतर त्वचारोग व हा रोग होण्यासाठी विशेषत्वाने लागणारे ज्योतिषीय नियम यांचा उहापोह होणे आवश्यक आहे.


गणित स्वाध्याय  ( गुण  - २५)

प्र. १. एका बालकाचा जन्म ला पाझ (बोलिव्हिया) La paZ (Bolivia) अक्षांश १६.३१ दक्षिण व रेखांश ६८.०९ पश्चिम येथे दिनांक १ एप्रिल २०१९ रोजी तेथील विभागीय वेळेनुसार सकाळी १० वाजून २५ मिनिटांनी झाला. बोलिव्हिया येथे ऑक्टोबर ते मार्च या काळात समर टाइम लागू होतो.           ( गुण  - ८)

        १) गणिताने रेखानंतर, घड्याळी फरक , रेखांतर संस्कार काढून इष्ट सांपातिक वेळ
            साधन करा.
       
        २) अयनांश २४.०७.१७ घेऊन लग्नादी द्वादश भाव स्पष्ट करा.


प्र. २.  सप्तशृंगी (नाशिक) अक्षांश २०.५८ (उत्तर) रेखांश ७३.५३ (पूर्व) येथे एका बालकाचा जन्म दि. ११/०८/२०१९ च्या पहाटे २ वाजून ३४ मिनिटांनी झाला आहे.  श्रीपती पद्धतीने या बालकाच्या पत्रिकेतील लग्नादी द्वादश भाव स्पष्ट करा.                                                                                                            ( गुण  - ८)

या गणितात पलभेवरून चरखंड, पळे  इ. साधन करून स्वोदय पळे काढणे व त्यावरून स्पष्ट लग्न सिद्ध करणे अपेक्षित करणे.

प्र. ३  अ)  नाशिक येथे दिनांक ४ एप्रिल २०१९ रोजी सूर्योदयागत ४० घटी २५ पळे या वेळी जन्मलेल्या                जातकाचे होरा लग्न, इंदुलग्न, आरूढलग्न स्पष्ट करा.                                              ( गुण  - ६)   


        ब) सोनालीचा जन्म २० डिसेंबर २०१८रोजी दुपारी २.३० मिनिटांनी (म्हणजे १४.३०) सोलापूर येथे झाला. तर तिच्या वयाच्या ४९व्या वर्षाची दिनवर्ष पद्धतीने कुंडली तयार करा.                           ( गुण - )
  

निबंध स्वाध्याय ( गुण  - २५)


विषय  १ : वकील  (Advocate)

यामध्ये वकीलीची बार कौन्सिलची सनद मिळवलेले व जे न्यायालयात गेली किमान ५ वर्ष वकीली करत आहेत अशा जातकांचे वकील होण्याची ज्योतिषीय नियम व कालनिर्णय यांचे विवेचन करुन निष्कर्ष काढणे अपेक्षित आहे. (वकीलाच्या त्याच्या वकीलीच्या विषयासंदर्भात विवेचन आवश्यक आहे.  उदा. क्रिमिनल, सिव्हील, कौटुंबिक इत्यादी)



विषय २  : मेदवृद्धी

मेदवृद्धीच्या १५ जातकांच्या पत्रिका निवडून त्यांची मेदवृद्धी होणे व अशी मेदवृद्धी होण्याची ज्योतिषीय  कारणे व कालनिर्णय खालील निकषांच्या आधारे विषद करणे अपेक्षित आहे.

१.   पाश्च्यात्य निकशांनुसार Body Mass Index – BMI.
२.  भारतीय आयुर्वेद शास्त्रानुसार उंचीच्या मानाने वजन जास्त असणे पर्यायाने पोट,   छाती, कुल्ले,दंड,मांड्या, मान या ठिकाणी मेदवृद्धि होऊन वजन वाढणे.


No comments:

Post a Comment

विशेष सर्वसाधारण सभा सूचना - १९.०७.२०२५

https://drive.google.com/file/d/18_QyZtAgAlXg-FS31uWHn3FksUsHkhpd/view?usp=sharing