भावपूर्ण श्रद्धांजली
महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे सल्लागार व ज्योतिर्विद्या संशोधन मंडळ, नाशिक या संस्थेचे संस्थापक कार्यवाह श्री. कृष्णराव प्र. वाईकर यांचे बुधवार दि. १२ सप्टेंबर २०१८ रोजी दु:खद निधन झाले. ज्योतिष शास्त्राच्या अभ्यासकांसाठी त्यांनी कुंडलीची भाषा (खंड १ ते ४ ), रवि - चंद्राचे १४४ योग, कुंडलीची गोलंदाजी, छंद ज्योतीर्विद्येचा आदि अनेक पुस्तके लिहिली. ' ज्ञानदीप लावू जगी नाचू ज्योतीर्विद्येचे अंतरंगी ' ही त्यांनी केलेली घोषणा प्रसिध्द झाली होती. कै. वाईकर सरांनी सातारा येथे म. ज्यो. प. ने आयोजित केलेल्या अखिल भारतीय ज्योतिष सम्मेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. ते एक उत्तम ज्योतिष अभ्यासक तर होतेच त्याच बरोबर एक श्रेष्ठ समाजसेवक ही होते. सन १९५० पासून त्यांनी नाशिक जिल्ह्यात कुष्ठरोग निवारण मंडळाचे कार्य सुरु केले. १९९५ पासून कुष्ठरोग्यांच्या मुलांसाठी निवारा केंद्र ही सुरु केले ज्योतिष शास्त्रातील एक गाढा अभ्यासक ज्योतिष विश्वाने गमावला आहे. ज्योतिष शास्त्रातील या ज्ञान महर्षींना
महाराष्ट्र ज्योतिष परिषदेच्या कार्यकारिणी व सभासदां तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.
कै. वाईकर सरांना श्रद्धांजली वाहण्याकरिता ज्योतिर्विद्या संशोधन मंडळ नाशिक यांचे वतीने ' तिरुपती शिल्प' ढिकले नगर नाशिक येथे गुरुवार दि. २० सप्टेंबर २०१८ रोजी सायंकाळी ०५:०० वाजता शोकसभा आयोजित केलेली आहे.
No comments:
Post a Comment