महाराष्ट्र ज्योतिष परिषदेची सर्वसाधारण सभा व नवीन कार्यकारिणी करीता निवडणूक कार्यक्रम
महाराष्ट्र ज्योतिष परिषदेच्या सर्व आजीव सभासदांना कळविण्यात येते की,
परिषदेची सर्व साधारण सभा भाद्रपद कृ.१३ शक १९४० म्हणजेच रविवार दि.७ ऑक्टोबर २०१८ रोजी डोंबिवली येथील ज्ञानेश्वर कार्यालय सभागृहात सकाळी १०:३० वाजता घेण्यात येणार आहे. तरी सर्व आजीव सभासदांनी सभेस उपस्थित राहावे. सर्वसाधारण सभेचे सूचना पत्र पाहण्या करीता इथे क्लिक करा त्याच प्रमाणे महाराष्ट्र ज्योतिष परिषदेच्या नवीन कार्यकारिणी सदस्यांची निवड करण्याकरिता सभेच्या ठिकाणी सभेच्या वेळी निवडणूक घेण्यात येणार आहे. परिषदेसाठी कार्य करण्यास इच्छुक सभासदांनी निवडणुकीत भाग घेण्याकरिता आपला उमेदवारी अर्ज दि. २५ सप्टे.२०१८ पर्यंत परिषदेने नियुक्त केलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी यांचे नवे म. ज्यो. प. कार्यालयाच्या पत्त्यावर पाठवावा.
कार्यालयाचा पत्ता-
महाराष्ट्र ज्योतिष परिषद
१४/१५ एकता अपार्टमेंट, नवरे कंपाऊंड, एव्हरेस्ट हॉल च्या मागे, पं. दीनदयाळ उपाध्याय मार्ग, डोंबिवली (प.), ४२१ २०२.
प्रत्येक सभासदास उमेदवारी अर्ज ( सभेच्या सूचना पत्रासह ) परिषदेकडून पाठविण्यात आलेला आहे.
आपला निवासी पत्ता बदललेला असल्यास कृपया बदललेल्या पत्त्याविषयी परिषदेस त्वरित कळवावे. जेणेकरून परिषदेच्या घडामोडींबद्दल आपणास वेळोवेळी सूचित करणे परिषदेच्या कार्य्कारीणीस सुलभ होईल.
कळावे
सिद्धेश्वर मारटकर
अध्यक्ष - महाराष्ट्र ज्योतिष परिषद.
No comments:
Post a Comment