Tuesday, September 25, 2018

माहिती पत्रकातील दुरुस्ती


 माहिती पत्रकातील दुरुस्ती


सर्व संबंधीतांना कळविण्यात येते की, माहितीपत्रक पृष्ठ क्रमांक २३ वर ज्योतिष शास्त्री परीक्षा २०१८ असे छापले गेले आहे ते  ज्योतिष शास्त्री परीक्षा २०१९  असे वाचावे
 त्याच प्रमाणे निबंध स्वध्यायचे गुण २५ छापले आहेत ते गुण ७५ अशी दुरुस्ती करून घ्यावी.

परीक्षा विभाग सचिव
महाराष्ट्र ज्योतिष परिषद

Friday, September 21, 2018

म.ज्यो. प. आजीव सभासद





महाराष्ट्र  ज्योतिष  परिषदेच्या आजीव सभासदांच्या यादीसाठी   इथे क्लिक करा.

Saturday, September 15, 2018

म. ज्यो.प. सर्वसाधारण सभा कार्यकारिणी निवडणूक


 महाराष्ट्र ज्योतिष परिषदेची  सर्वसाधारण सभा व नवीन कार्यकारिणी करीता निवडणूक कार्यक्रम

 महाराष्ट्र ज्योतिष परिषदेच्या सर्व आजीव सभासदांना कळविण्यात येते की,
परिषदेची सर्व साधारण सभा भाद्रपद कृ.१३ शक १९४० म्हणजेच रविवार दि.७ ऑक्टोबर २०१८ रोजी डोंबिवली येथील ज्ञानेश्वर कार्यालय सभागृहात सकाळी १०:३० वाजता घेण्यात येणार आहे. तरी सर्व आजीव सभासदांनी सभेस उपस्थित राहावे. सर्वसाधारण सभेचे सूचना पत्र पाहण्या करीता  इथे क्लिक करा 

त्याच प्रमाणे महाराष्ट्र ज्योतिष परिषदेच्या  नवीन कार्यकारिणी  सदस्यांची निवड करण्याकरिता सभेच्या ठिकाणी सभेच्या वेळी निवडणूक घेण्यात येणार आहे. परिषदेसाठी कार्य करण्यास इच्छुक सभासदांनी निवडणुकीत भाग घेण्याकरिता आपला उमेदवारी अर्ज दि. २५ सप्टे.२०१८ पर्यंत परिषदेने नियुक्त केलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी यांचे नवे म. ज्यो. प. कार्यालयाच्या पत्त्यावर पाठवावा.
कार्यालयाचा पत्ता-
महाराष्ट्र ज्योतिष परिषद
१४/१५ एकता अपार्टमेंट, नवरे कंपाऊंड,  एव्हरेस्ट हॉल च्या मागे, पं. दीनदयाळ उपाध्याय मार्ग, डोंबिवली (प.), ४२१ २०२.

प्रत्येक सभासदास उमेदवारी अर्ज ( सभेच्या सूचना पत्रासह ) परिषदेकडून पाठविण्यात आलेला आहे.

आपला निवासी पत्ता बदललेला असल्यास कृपया बदललेल्या पत्त्याविषयी परिषदेस त्वरित कळवावे. जेणेकरून परिषदेच्या घडामोडींबद्दल आपणास वेळोवेळी सूचित करणे परिषदेच्या कार्य्कारीणीस सुलभ होईल.

कळावे 
सिद्धेश्वर मारटकर 
अध्यक्ष - महाराष्ट्र ज्योतिष परिषद.

Friday, September 14, 2018

भावपूर्ण श्रद्धांजली

भावपूर्ण श्रद्धांजली 

महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे  सल्लागार  व ज्योतिर्विद्या संशोधन मंडळ, नाशिक या संस्थेचे  संस्थापक  कार्यवाह श्री. कृष्णराव प्र. वाईकर  यांचे बुधवार दि. १२ सप्टेंबर २०१८ रोजी दु:खद निधन झाले. ज्योतिष शास्त्राच्या अभ्यासकांसाठी त्यांनी कुंडलीची भाषा (खंड १ ते ४ ),  रवि - चंद्राचे १४४ योग, कुंडलीची गोलंदाजी, छंद ज्योतीर्विद्येचा आदि अनेक पुस्तके  लिहिली. ' ज्ञानदीप लावू जगी नाचू  ज्योतीर्विद्येचे अंतरंगी ' ही त्यांनी केलेली घोषणा प्रसिध्द  झाली होती. कै. वाईकर सरांनी सातारा येथे  म. ज्यो. प. ने आयोजित केलेल्या अखिल भारतीय ज्योतिष सम्मेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. ते एक उत्तम ज्योतिष अभ्यासक तर होतेच त्याच बरोबर एक श्रेष्ठ समाजसेवक ही होते. सन १९५० पासून त्यांनी नाशिक जिल्ह्यात कुष्ठरोग निवारण मंडळाचे कार्य सुरु केले. १९९५ पासून कुष्ठरोग्यांच्या मुलांसाठी निवारा केंद्र ही सुरु केले  ज्योतिष शास्त्रातील एक गाढा अभ्यासक  ज्योतिष विश्वाने गमावला आहे. ज्योतिष शास्त्रातील या ज्ञान महर्षींना  
महाराष्ट्र ज्योतिष परिषदेच्या कार्यकारिणी व सभासदां तर्फे  भावपूर्ण श्रद्धांजली.

कै. वाईकर सरांना श्रद्धांजली वाहण्याकरिता ज्योतिर्विद्या संशोधन मंडळ नाशिक यांचे वतीने ' तिरुपती शिल्प' ढिकले नगर नाशिक येथे गुरुवार दि. २० सप्टेंबर २०१८ रोजी सायंकाळी ०५:०० वाजता शोकसभा आयोजित केलेली आहे.

विशेष सर्वसाधारण सभा सूचना - १९.०७.२०२५

https://drive.google.com/file/d/18_QyZtAgAlXg-FS31uWHn3FksUsHkhpd/view?usp=sharing